महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षण
छप्पर कोसळलेल्या कांदळगाव शाळेला माजी खासदार नीलेश राणे यांची भेट
कणकवली : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं-२ या शाळेचे छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सोमवारी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी केली.
यावेळी छप्पर कोसळलेल्या शाळा इमारतीची पाहणी करून संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास माझ्या स्वखर्चातून या शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू करून लवकरच कांदळगाव शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होईल अशी व्यवस्था देखील माझे खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.