जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पालघर जिल्ह्यात १० शाळांना दूरदर्शन संच

पालघर : जिल्ह्यातील नरोडा, सफाळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील १० शाळांना मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे वाटप करण्यात आले.
संस्थानाच्या मदतीमुळे या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना दूरदर्शनच्या साह्याने शिक्षण घेणे शक्य होणार आहे. हा सोहळा नरोडा सफाळे पूर्व रस्त्यावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स समोरील मैदानावर झाला.
आजच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची आवश्यकता आहे; ही नेमकी गरज ओळखून संस्थानाने केलेल्या या मदती बद्दल या शाळांनी आभार मानले आहेत.संस्थानाच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत वेळोवेळी अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत केली जाते. दूरदर्शनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी आजच्या तंत्रज्ञानाला अनुसरून आनंददायी शिक्षण घ्यावे व स्वतःची प्रगती साधावी यासाठी ही मदत करण्यात आली आहे.
दूरदर्शन संच दिलेल्या जिल्हा. परिषदेच्या प्राथमिक शाळा पुढीलप्रमाणे १) चौकी उंबरपाडा
२) दारशेत ३) घरतपाडा ४) डिगीपाडा महागांव ५)सुतारपाडा मान ६) साखरे ७) पंडित पाडा माकणे ८) शिशने वगणपाडा ९) चिंचले खडकीपाडा १०) मोहाळे केळवेरोड. या शाळांच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याचा स्वीकार केला.या सोहळ्याला सफाळे पोलिस निरीक्षक श्री. दत्ता शेळके पालघर जिल्हा बहुजन विकास आघाडी संघटक प्रवीण राऊत. सफाळेचे उपसरपंच श्री. राजेश म्हात्रे, श्री. विजय पटेल यांच्यासह स्वस्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी, तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.