जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकाचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

नाणीज : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका सेवेचे करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील चालक बाळू अंकुश कातकडे यांचा करमाड पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक मनीष कळवनिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामार्गावर वेळोवेळी झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

नाणीज येथील संस्थानच्या राज्यातील विविध महामार्गावर एकून ५२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघातातील जखमींना त्या मोफत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होते. संस्थानच्या या रुग्णवाहिका सेवेने आत्तापर्यंत २३ हजारांवर जखमींचे प्राण वाचवले आहेत.
सत्कारमूर्ती चालक बाळू कातकडे संभाजीनगर जालना महामार्गावरील करमाड पॉईंट येथे कार्यरत आहेत. तिथे संस्थानची रुग्णवाहिका २४ तास कार्यरत असते. करमाड परिसर, शेकटा, गोलगाव फाटा, कुंभेफल, शेंद्रा एमआयडीसी त्या भागात ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरली आहे. या रुग्णवाहिकेने २०२३ मध्ये एकूण ७८ अपघात झाले. तर त्यात ९५ जण जखमी झाले. २०२४ मध्ये १ जून अखेर ७१ अपघात झाले. त्यातील जखमींची संख्या १७५ होती. सर्वांचे प्राण वाचवल्याबद्दल श्री कातखडे यांना गौरवले आहे. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते सत्कार झाला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, भागातील पोलीस पाटील व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त उपस्थित होते.