जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून विरारमध्ये ४७ वे मरणोत्तर देहदान
वसई दि. ३१:- तालुक्यातील आगाशी चाळफेठ येथील मंजुळा अरुण वर्तक, वय ६७ यांचे आज निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ४७ वे देहदान आहे.
श्रीमती वर्तक यांचा मुलगा श्री. राजेश अरुण वर्तक व जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाचे पदाधिकारी यांनी पार्थिव नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केले. तेथील आरोग्यशास्त्राच्या डॉक्टरनी तो स्वीकारला. कॉलेजने तसे प्रमाणपत्र वर्तक कुटुंबियांना दिले आहे.
या निर्णयाबद्दल श्री. राजेश वर्तक आणि परिवाराचे जगद्गुरुश्री यांच्या स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी वर्तक परिवारातील त्यांचे पती श्री अरुण वर्तक, मुलगा – राजेश वर्तक, भाऊ – विशाल वर्तक उपस्थित होते.