जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे देहदानाचे कार्य गौरवास्पद
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी:- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे मरणोत्तर देहदन जागृतीचे कार्य चांगले व गौरवास्पद आहे. त्याच धर्तीवर गोव्यातही त्यांनी हे काम चालू केले आहे, ते आम्हाला अभिनस्पद आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.
ते जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानने ओल्ड गोव्यात आयोजित केलेल्या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवात बोलत होते. सुरुवातीला दीपमाळ प्रजवलीत करण्यात आली. त्यानंतर संस्थानच्या सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना २२ ग्रास कटर्सचे मोफत वाटप करण्यात आले.या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्यासह पद्मनाब शिष्य संप्रदायाचे पीठाधीश, चैतन्य आश्रम बोरीचे प.पू. राधे स्वामी, राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाच्या गोवा राज्याचे संघसंचालक मोहन आमसेकर, विश्व हिंदू परिषद सदस्य अनिल सामंत, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक आदी उपस्थित होते. सर्वांनी संस्थानच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ” जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे देहदनाचे कार्य गौरवास्पद आहे. त्यांनी गोव्यातही हा उपक्रम सुरू केला आहे. ५०० जणांनी देहदनाचे फॉर्म भरून दिले आहेत. मी सुरुवातीपासून महाराजांचे मार्गदर्शन घेत आहे. दरवर्षी आजच्या दिवशी न चुकता स्वामीजींच्या दर्शनासाठी येऊन त्यांचे शुभआशीर्वाद घेत असतो. संस्थान राबवीत असलेले सर्व सामाजिक उपक्रम समाज हिताचे आहेत..तत्पूर्वी विविध अध्यात्मिक, सांस्कृतिक , सामाजिक, कार्यक्रम झाले. यात युवांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, नुतन शिव मंदिराची पायाभरणी, दिपमाला प्रज्वलन करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या हस्ते ब्रम्हानंद स्वामीजींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रात्री माऊलींचे अमृतमय प्रवचन झाले. शेजारतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस उद्यापासून विजेवर धावणार!
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या