महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

जगा आणि जगू दया : सर्पमित्र रोहन वारेकर

  • आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर मुलाखत

रत्नागिरी :  साप आणि मानव संघर्ष ते सहजीवन हा प्रवास मांडणाऱ्या सर्पमित्र रोहन वारेकर यांनी जगा आणि जगू दया, असा संदेश दिला आहे इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
गेली वीस वर्ष सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या रत्नागिरीतील सर्पमित्र रोहन वारेकर यांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर होणाऱ्या इंद्रधनुष्य या कर्यक्रमात सहभागी होऊन सापांच्या जाती , सर्पदंश, गैरसमज, वनविभागाची हेल्पलाईन, किंग कोब्रा या विषयी सखोल माहिती दिली. जागतिक स्तरावर किंग कोब्रा या विषयी शोधपत्र सादर केलेल्या वारेकर यांनी त्यांचे थरारक अनुभवही या मुलाखतीत उलगडले आहेत. ही मुलाखत शनिवारी 7 मार्च रोजी सकाळी 9.30 मि. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारीत होणार असून या मुलखतीत त्यांच्याशी सोनाली सावंत यांनी संवाद साधला आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.
साप हा अन्न साखळीमधला महत्वाचा घटक असून मानव आणि साप यांच्यातला संघर्ष आता सहजीवन या टप्प्यावर पोचला आहे. हा संपूर्ण प्रवास या मुलाखतीत ऐकायला मिळणार आहे. 1143 कि.ह. या मध्यमलहरी वाहिनीवर तसंच 101.5 मे.ह. या एफ. एम. वाहिनीवर सर्व नागरिकांनी ही मुलाखत अवश्य ऐकावी असं आवाहन करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button