जाकादेवी, कोतवडेसह मालगुंड येथे रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांचे शिबीर
रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून जाकादेवी, कोतवडे आणि मालगुंड येथे आशासेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आशा सेविका या आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण भागातील जनता यांच्यातील दुवा असतात. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आशा सेविकांचे मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जाकादेवी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. संपत मीना तसेच गटप्रमुख वैदेही शिर्के उपस्थित होत्या. तर कोतवडे येथे गटप्रवर्तक अश्विशी आपकारे, श्रद्धा पालकर आणि मालगुंड येथे वैद्यकी अधिकारी डॉ. सुनिता पवार, गटप्रवर्तक सिद्धी आडाव आणि धन्वंतरी रुग्णालयाकडून श्वेता कदम, शैलेश धुळप, ऐश्वर्या सिस्टर, रुशिका सिस्टर यावेळी उपस्थित होते.