जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात कार्यक्रम

चिपळूण : ५ जून २०२५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मांडकी- पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जागृतीसाठी उपक्रम राबवण्यात आला. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित या महाविद्यालयांनी समाजात पर्यावरणाबाबत सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सकाळी मांडकी-पालवण गावात प्रभातफेरी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रभातफेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा, जीवन वाचवा”, “पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा” अशा घोषणांनी गावात जनजागृती केली.
या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी उपस्थित गावकऱ्यांना करण्यात आले.