‘जिंदल’च्या वायूगळतीबाबत खा. नारायण राणे उद्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
रत्नाागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. जयगड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या जिंदल समूहाच्या जे.एस. डब्ल्यू. पोर्टच्या वायुगळतीच्या दुर्घटनेबाबत ते जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी संवाद साधून कारवाईबाबत माहिती घेणार आहेत.
दौरा कार्यक्रमानुसार खा. राणे हे सोमवार दि. 23 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी येथे आगमन होणार असून दुपारी 1 वाजता ते जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत. त्या नंतर दुपारी 2 ते 4 वाजता ते आरोग्य मंदिर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ज्यांची कामे असतील त्यांनी निवेदन घेवून वरील वेळत उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. खा. राणे हे सायंकाळी 4 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.