महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

जिद्द, चिकाटीच्या जोरावर बेनीतील शेतकऱ्याने तयार केली तब्बल दहा लाख हापूस आंबा, काजूसह फणसाची कलमे!

  • लांजा तालुक्यात रोपवाटिका व्यवसायात निर्माण केले नाव

लांजा : कोणतीही कृषी पदवी नसताना केवळ अनुभव, जिद्द मेहनत चिकाटी जोरावर लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथील विनोद सदाशिव राऊत या शेतकऱ्याने हापूस आंबा, काजूसह फणसाची कलम बांधणी करून सुमारे १० लाख रोपे तयार करण्याचा मोठीं यशस्वी कामगिरी केली आहे. या जोडीला या शेतकऱ्याने रोपवाटिका व्यवस्थापनात नवा आदर्श उभा केला आहे.

विनोद राऊत कलमे तयार करताना.

विनोद सदाशिव राऊत यांनी तयार केलेल्या रोपातून शेकडो बागा बहरल्या आहेत. ते दिवसाला १००० कोय कलमे ते जून ते जुलै या दोन महिन्यात तयार करतात. कृषी पदवी नसताना या सामान्य शेतकऱ्याने बेनी येथे विविध फळझाडाची नर्सरी जोपासली आहे. अतिशय कष्ट, मेहनत आणि जिद्दीतून या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाचा आणि इतरांना रोजगार रोजगार देण्याचे मोठे काम केले आहे. या शेतकऱ्याने तयार केलेल्या बाटा (कोय) कलमांना कोल्हापूर सातारा, पश्चिम महाराष्ट्रात मोठी मागणी आहे.

आसगे येथील सुधा नर्सरीचे मालक आदर्श शेतकरी स्वर्गीय दिलीप भाऊ नारकर यांच्यापासून श्री. विनोद राऊत यांनी प्रेरणा घेतली भाऊ नारकर यांच्या नर्सरीत काही वर्ष त्यांनी झाडे जोपासण्याचे काम केले. झाडे कसे वाढवावी कशी निगा राखवी, कोणते खत घालावे, रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे, कोय कलम कसे बांधावे हे विनोद राऊत अनुभवातून शिकून घेतले. त्यांचे शिक्षण फारसे नाही परंतु केवळ अनुभव आणि जिद्दीवर त्यांनी राहत्या घराच्या बाजूला फणस वीज प्रकारचे आंबे यामध्ये केसर, रत्ना, हापूस आंबा यांची झाडे वाढवली त्याचबरोबर चिकू, कोकम, आवळा, आदी फळे झाडे जोपासली आहे.

गेली वीस वर्षे विनोद राऊत यांनी बाटा कलम बांधणीचे काम सुरू केले. सुरुवातीला रायवळ आंब्याच्या बाटा गोळा करून ते हापूस आंबा काजू फणस यांचे अमर वृक्ष फांदी घेऊन कलम रोपे तयार करत होते. रायवळ आंब्याच्या कोयीपासून निर्माण होणारे कलम बांधणी फारसी यशस्वी होत नसे. विनोद राऊत यांनी यावर वेगळे पद्धत वापरून हापूस आंबा कोय पावस येथील आंबा कॅनिंगमधून आणून त्यावर बाटा कलम करण्याची पद्धत अमलात आणली. हापुस केसर आणि रत्न या या कोईवर पाठक कलम बांधणी कलमे याला येणारे फळधारणा ही चांगल्या दर्जाची असल्याचे राहू त्यांनी सांगितले राऊत यांनी आसगे येथील अशोक गोतावळे यांच्या नर्सरीमध्ये बाटा कलमे तयार करतात  एका बाटा कलमाला शंभर रुपये याप्रमाणे विक्री आहे. डबल कोईचे बाटा कलम रोप चांगल्या दर्जाचे असल्याचे राहू त्यांनी सांगितले राउत नर्सरीमध्ये फणस, काजू, चिकू, लिंबू, कोकम आणि विविध प्रकारचे आंबे यांचे कलम बांधणी होत.

राऊत यांच्या मदतीला त्यांची पत्नी ही साथ देते कोणतीही कृषी पदवी नसताना विनोद राऊत यांनी केलेली शेती व्यवसायातील प्रगती ही कौतुकास्पद आहे कोणत्याही प्रसिद्धीच्या झोपतात नसलेले विनोद राऊत इतर शेतकऱ्यांना निश्चितच आदर्श ठरले आहेत.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button