रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करीत रत्नागिरी जिल्हावासियांसाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2025 या वर्षासाठी नारळीपौर्णिमा सणानिमित्त शुक्रवार 8 ऑगस्ट, जेष्ठागौरी विसर्जन मंगळवार 2 सप्टेंबर आणि नरकचर्तुदशी (अभ्यंगस्नान) सोमवार 20 ऑक्टोबर रोजी अशा तीन सुट्टया जाहीर केल्या आहेत.
याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी प्रसिध्दीस दिली आहे.