जिल्हाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा
रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आढावा घेतला.
यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते
श्री. सिंह यांनी यावेळी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये एसएसटी, एफएसटी पथकांकडून केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. एसएसटी, एफएसटी पथकांनी कशा प्रकारे काम करावे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले.
श्री. सिंह यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन उपलब्धता, प्रशिक्षण, मतदान साहित्य, नामनिर्देशन, टपाली मतदान प्रक्रिया आदी विषयांचाही आढावा घेतला.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या ईव्हीएम मशिन्स सुरक्षाकक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड आणि 266 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई उपस्थित होते.
हातखंबा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट
266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील हातखंबा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाच्या तपासणी नाक्याला जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी श्री. देसाई उपस्थित होते. एसएसटीने केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. सतर्क राहून वाहनांची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या.