महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणस्पोर्ट्स
जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी खेडशी तायक्वांदो क्लब रत्नागिरीचा संघ जाहीर

रत्नागिरी : चिपळूण येथे २ ते ४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी खेडशी तायक्वांदो क्लब रत्नागिरीने संघ जाहीर केला आहे.
स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून अमित जाधव काम बघणार आहेत. या स्पर्धेकरीता रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन तायक्वांदो स्पोर्ट सेंटर खेडशी क्लब यांचे पदाधिकारी आणि समस्त पालक वर्ग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व शहानुर तायक्वांदो अकॅडमी चिपळूण यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत स्वामी मंगल हॉल बहादुर शेख नाका चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सुवर्णपदक विजेता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.