ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज मार्गी लावा : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.*
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला. आज नव्याने 5 अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी.