कृषिविश्व कृषिदूत संघाकडून कुटरे येथे चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक

कुटरे : चिपळूण: गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिविश्व कृषिदूत संघाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुटरे येथे संजय राजेशिर्के यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक राबविले.
या प्रात्यक्षिकाची सुरवात खताचे झाड, गिरिपुष्पाचा पाला शेतात टाकून झाली. मातीत नत्राचे प्रमाण युरिया न टाकता वाढवण्यासाठी खताच्या पाल्याचा वापर करण्याचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले. दोरीच्या साह्याने रोपांची पुनर्लागवड करण्यात आली.
या प्रत्यक्षिकासाठी आसपासचे शेतकरी आणि कृषिदूत ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके यांनी अथक परिश्रम घेतले, तसेच चारसूत्री पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.