जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी इच्छुकांना खुशखबर!
प्रतीक्षा यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
रत्नागिरी : जिल्हा परिषद, रत्नागिरी अतंर्गत 31 मार्च 2023 अखेर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या परिपूर्ण, अपूर्ण व अपात्र अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ही प्रतिक्षा यादी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयाच्या www.zpratnagiri.org व रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यादीमधील अनुकंपा उमेदवारांच्या माहितीची खातरजमा करुन त्यामध्ये काही हरकती असल्यास 24 एप्रिल 2023 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे योग्य त्या पुरावा पृष्ठयर्थ कागदपत्रांसह सादर कराव्यात. दि.24 एप्रिल 2023 नंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी कळविले आहे.