जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकाच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी, दि. 26 : जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात दापोली येथे काम करणारी उत्तर प्रदेश च्या खाणी कामगाराचे १९८० ग्राम इतके कमी वजनाचे दाखल झालेल्या नवजात बालकाच्या डोळ्यांची तपासणी केली असता, या बालकाला (आर ओ पी) रेटिनोपॕथी आॕफ प्रीमॕच्युरिटी या आजाराचे निदान झाले. या नवजात बालकावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्परतेने उपचार सुरु करुन, बालकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात 19 डिसेंबर रोजी डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत लेझर ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.
(ROP)retinopathy of prematurity या आजारामध्ये उपचार देण्यास उशीर केल्यास बाल कायमचे आंधळे होऊ शकते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत दोन्ही डोळ्यांमध्ये मोफत इंजेक्शन देण्यात आले.
परंतु, पुन्हा तपासणीच्या वेळी या बाळाच्या डोळ्याला लेझर ऑपरेशन ची गरज असल्याचे समजले. या बालकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात 19 डिसेंबर रोजी डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत लेझर ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. हे बालक 69 व्या दिवशी पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. या बालकावर सर्व चाचण्या, तपासण्या व औषधोपचार हे मोफत करण्यात आले आहेत. हे बाळ आता पूर्णपणे बरे झाले असल्यामुळे नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. नातेवाईकांनी आरोग्य यंत्रेणेचे आभार मानले.