डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात बालदिन उत्साहात

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (बालदिन) उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.नंदा कांबळे मॅडम व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . विद्यार्थी मनोगतामध्ये पंडित नेहरूंच्या जीवनाच्या जीवनाचा आढावा घेऊन त्यांचे कार्य किती सखोल आहे याची माहिती सांगितली.
तसेच प्राध्यापक मनोगतात प्रा. सोनल सुर्वे यांनी आपल्या मनोगता मधून जवाहरलाल नेहरूंचे विचार विद्यार्थी जीवनात कसे उपयोगी आहेत ते सांगितले तसेच नेहरूंच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंग सांगितले.त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये नेहरूंच्या राजकीय तसेच सामाजिक विचाराची माहिती दिली.त्यांना लहान मुलांची आवड होती अशा अनेक विविध बाबींवर दृष्टिक्षेप टाकला. अशा प्रकारे अमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष वाणिज्यचा विद्यार्थी कु.गिरीश धामणे ने केले तर आभार प्रदर्शन तृतीय वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु अविराज जाधव याने केले.





