ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

तपासणी पथकाने रत्नागिरीत पकडले ३५ लाखांचे सोने

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीमध्ये हातखंबा येथे कारवाई

रत्नागिरी, दि. १२ : मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता, ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विनापावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.

इको हे वाहन मुंबईहून रत्नागिरीकडे आज येत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या एसएसटी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने मिळून आले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एसएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button