महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

तळवडे ग्रामपंचायतीचा निर्माल्य संकलनाचा उपक्रम

लांजा : तळवडे ग्रामपंचायतीने गुरुवारी गणपती विसर्जन वेळी तळवडे येथील नदी काठावर विसर्जन घाटावर निर्माल्य संकलनासाठी स्तुत्य उपक्रम राबविला.निर्माल्य नदीपात्रात सोडून नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी तळवडे ग्रामपंचायतीने तळवडे येथे सर्व विसर्जन घाटावर निर्माल्य संकलनासाठी कुंड्या ठेवल्या होत्या. यामध्य गणेश भक्तांनी गणेश मूर्ती सोबत आणलेले हार, फुले फुलारा या कुंडीत एकत्रित केला.सरपंच सौ. रोहिणी आंबेकर, उपसरपंच प्रसाद ढेपे आणि ग्रामसेवक श्री पालये आणि सर्व सदस्य यांचे या उपक्रम राबविल्याबाबत कौतुक होत आहे. संस्कार प्रतिष्ठानने या उपक्रम चे कौतुक केलं आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button