दापोली समुद्रकिनाऱ्यावर आढळले दोन मृतदेह

- केळशी आणि आंजर्ले येथे खळबळ
दापोली : दापोली तालुक्यातील केळशी आणि आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर आज, बुधवारी दोन अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, सायंकाळपर्यंतही या मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही.
नेमकं काय घडलं?
बुधवारी केळशी समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. त्याचवेळी आंजर्ले येथील दुसऱ्या समुद्रकिनारीही आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. दोन्ही ठिकाणी मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
सध्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. मृतदेह कोणाचे आहेत, ते कोणत्या कारणाने मृत पावले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आजूबाजूच्या गावातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.