दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी: दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन कोकण नगर येथील मदरसा फैजाने अत्तार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात, दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या विशेष दिनानिमित्त, मदरसाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ‘नात’ (इस्लामिक स्तोत्र) सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मौलाना अल्ताफ कुरेशी, अकील मेमन, उवेज जरीवाला, आणि मदरसा फैजाने अत्तारचे मुख्याध्यापक अहमद रजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर, उपस्थित मुलांना समोसे आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष फारुख जरीवाला आणि अमजद अत्तारी यांचीही विशेष उपस्थिती होती.
दावते इस्लामीच्या या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.