दिव्यांग बांधव ४ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर धडकणार!
चिपळूण : अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान मुंबई इथे दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनामार्फत दिव्यांगाना सध्या जे अर्थसहाय्य मिळते ते किमान ३००० मिळावे, जे बोगस दिव्यांग प्रमाणापत्र बनवून सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांची चौकशी व्हावी, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्याने उपस्थित रहावे, असे आवाहन अपंग जनता दलाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष फैसल सय्यद यांनी केले आहे. या मोर्चामध्ये शामिल होण्यासाठी. दिव्यांग बांधवांनी मोबाईल क्र. 8668480764 वर संपर्क साधावा, असे आवाहन फैसल सय्यद यांनी केले आहे.