महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

दुचाकीस्वाराला चिरडून दुचाकी एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेली; जमावाने ट्रक पेटवला

  • निवळी -जयगड मार्गावर अवजाड वाहतुकीने घेतला दुचाकीस्वार तरुणाचा बळी

रत्नागिरी : निवळी ते जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीच्या डोकेदुखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर मंगळवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. किरण कृष्णा पागडे (४२) या दुचाकीस्वार तरुणाचा या अपघातात हकनाक बळी गेला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी किरण पागडे हे चाफे येथून आपल्या दुचाकीवरून ( जाकादेवीकडे जात असताना समोरून येणाऱ्या एम एच ०४०/ बी एल ९९९८ या क्रमांकाच्या ट्रकने त्याला धडक दिली. अपघातात किरण यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र एवढा मोठा अपघात घडूही ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी न थांबवता त्याची दुचाकी घटनास्थळापासून जवळपास एक किलोमीटर दूर फरपटत नेली.

निवळी जयगड मार्गावरील भीषण अपघात


या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. दुचाकीस्वाराला चिरडून नंतर घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी ट्रेकचा पाठलाग करून तो पेटवून दिला. यामुळे परिसरात काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले त्यांनी परिस्थिती त्यांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, निवळी ते जयगड मार्गावर अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून, या समस्येवर उपाययोजना न झाल्याने हा मुद्दा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता या अपघातानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button