धुळ्याच्या नवदांपत्याची चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी!

- एनडीआरएफच्या पथकासह पोलिसांकडून अधिपत्रात बेपत्ता दोघांचा शोध सुरू
चिपळूण : मूळच्या धुळे जिल्ह्यातील असलेल्या आणि सध्या चिपळूणला येऊन राहिलेल्या नवदाम्पत्याने चिपळूण रेल्वे स्टेशन नजीकच्या गांधारेश्वर पुलावरून तुडुंब भरलेल्या वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक मंगळवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या घटनेआधी या नवदंपत्यांमध्ये वाद विवाद घडल्याचे समजते.
अशी आहेत नदीत उडी घेतलेले यांची नावे : १) नीलेश रामदास अहिरे (२६) व २) अश्विनी नीलेश अहिरे (१९, दोघेही राहणार साक्री, जिल्हा धुळे).


प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिल्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस ही माहिती मिळताच पोलीस बचाव पथकासह चिपळूण येथे तैनात असलेले एनडीआरएफचे पथकही या दोघांच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झाले. वाशिष्ठी नदीला सध्या वेगवान प्रवाह असल्याने उडी घेतलेल्या या दोघांचाही सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता.
अवघ्या काही महिन्यापूर्वीच लग्न झालेले हे दाम्पत्य सध्या चिपळूण येथेच राहत होते अशी माहिती मिळाली आहे. दुचाकी वरून हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गांधारेश्वर येथे आलेले असताना त्यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला. यानंतर आधी अश्विनी हिने नदीपत्रात उडी घेतली तर त्या पाठोपाठ निलेश याने देखील वाशिष्ठीच्या पात्रात उडी घेतली. या नवपरिणीत दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी घेणे इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
स्थानिक पोलीस तसेच राष्ट्रीय सुरक्षा व बचाव दलाकडून ( एन डी आर एफ ) या दोघांचाही सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता.