महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

देवरुखच्या श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या अध्यक्षपदी जी. के. जोशी बिनविरोध

देवरूख : श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा गजानन केशव जोशी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

श्री सद्गुरु लोकमान्य वाचायलय, देवरुखची वार्षिक सर्वसाधारणसभा वाचनालयाच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुरी, हिशेब मंजुरी, अंदाजपत्रक मंजुरी, अहवाल मंजुरी हे विषय झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी गजानन केशव जोशी, किरण मुकुंद देशपांडे संदीप सुरेश मुळ्ये, समीर चंद्रकांत आठल्ये, संभाजी शिवाजी आंब्रे, डॉ सौ वर्षा शिरीष फाटक, डॉ. मंदार वामन जाखी, मंगेश शांताराम गुरव, सौ अनघा अशोक लिमये, यांची एकमताने नवीन कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निमंत्रित सदस्य म्हणून राजेंद्र रवींद्र राजवाडे, सौ सीमा नितीन शेट्ये, सौ मंगला शामकांत अळवणी, श्रीमती सुनंदा जेरे, सुबोध सुहास जोशी, सौ विद्या खाडे यांची निवड करण्यात आली. सल्लागार समिती सदस्य म्हणून श्रीम. शालिनी जोशी, अरविंद कुलकर्णी, धनंजय दळवी, प्रमोद हर्डीकर, सुरेंद्र शिंदे आणि अमित कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची पहिली सभा नकतीच संपन्न झाली. या सभेत गजानन केशव जोशी यांची सलग सहाव्यांदा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सन 2008 पासून जोशी हे या वाचनालयाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. तत्पूर्वी त्यानी वाचनालयाचे कार्यवाह म्हणून सतरा वर्षे आणि तत्पूर्वी कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून दहा वर्षे काम केले आहे. गेली 42 वर्षे ते या वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात काम करत आहेत. सलग सहाव्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. वाचनालयाच्या कार्यवाहपदी संदीप सुरेश मुळ्ये आणि हिशेब तपासनीस पदी समीर चंद्रकांत आठल्ये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनियुक्त सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, निमंत्रित सदस्य आणि सल्लागार समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button