ब्रेकिंग न्यूजरत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
देवरूखात महाआघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

देवरूख : देवरूख येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवरूखची ग्रामदैवता श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिरात महाआघाडीच्या कार्यकर्तेच्या उपस्थितीत नारळ फोडून व श्री सोळजाई देवीच्या चरणी साकडे घालून करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशांत यादव आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.
यावेळी उबाठा शिवसेनेचे छोट्या गवाणकर. महिला आघाडीच्या सौ. वेदा फडके. सौ. निलम हेगशेट्ये. इशत्याक कापडी. नागेश चव्हाण. शरद पवार राष्ट्रवादीेचे मोहन वनकर. बाबा सावंत. निलेश भुवड दत्ताराम लिंगायत , यांचेसह आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.