देवरूख येथे ७ ते ९ मे दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसह खाद्य महोत्सव

- संगमेश्वर तालुका भाजपा व दत्त नगर स्पोर्ट्स क्लब, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार
देवरूख (सुरेश सप्रे) : भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुकाच्या पुढाकाराने कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण गौरव चषक भव्य निमंत्रितांसाठी राज्यस्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सव दि. ७ ते ९ मे २०२५ या कालावधीत देवरूख येथे संपन्न होणार आहेत.
भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका पुरस्कृत व दत्त नगर स्पोर्ट्स क्लब, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने या राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळयाला महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे. बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे.चिपळूण संगमेश्वर चे आम. शेखर निकम. माजी आमदार प्रमोद जठार. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचेसह राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने ” कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण गौरव चषक भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम बुधवार दि.७ मे २०२५ रोजी होईल. सायं ६.३० ते रात्रौ ११.०० स्पर्धेचे उद्घाटन साखळी फेरीतील सामने
गुरुवार दि.८ मे २०२५
सायं ६.०० ते रात्रौ ११.०० साखळी फेरी व उपउपांत्य फेरीचे सामने
शुक्रवार दि. ९ मे २०२५
सायं ६.०० ते रात्रौ ११.०० रात्रौ
उपउपांत्य, उपांत्य व अंतिम सामना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
या स्पर्धा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, कॉलेज मैदानावर होणार आहेत.या स्पर्धेची तयारी तालुका भाजपा अध्यक्ष रुपेश कदम. विनोद मस्के.अभी शेट्ये. निलेश भुरवणे. सुशांत मुळे जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी अभी सप्रे सह सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.