महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षण
देशातील पहिलं पुस्तकांचं गाव भिलारला मराठी भाषा मंत्र्यांची भेट

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील देशातील पहिलं पुस्तकांचं गाव असलेल्या भिलार या गावाला राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. भिलार या पुस्तकांच्या गावातील ८ व्या वर्धापन दिनानिमित्त ना. सामंत यांनी ही भेट दिली
यावेळी मराठी भाषा मंत्री सामंत यांनी गावातील कार्यालय आणि काही दालनांना पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसोबत संवादही साधला. इथं अजून एकूण ५ नवीन दालनं तयार करण्यात येणार आहेत. १२ हजार नवीन पुस्तकं इथं उपलब्ध होणार आहेत. सर्व दालनांचं सुशोभिकरण, रंगरंगोटी तसचं आसनव्यवस्था मराठी भाषा विभागामार्फत तयार करुन दिली जाणार असल्याचं ना. सामंत यांनी यावेळी सांगितलं.