दैनंदिन कामकाजातून राष्ट्रगीत वगळून विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी जागा

- रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनचा अजब कारभार
- विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने राष्ट्रगीत म्हणत दिला जोरदार दणका
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काही वेळा राष्ट्रगीत ऑप्शनला टाकले जात असल्याचे तसेच ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आरोप करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तंत्रनिकेतनच्या प्रचार्याना जाब विचारला.
हा प्रकार सातत्याने शासकीय तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निकमधे घडत असल्याचे माहिती मिळालयानंतर गुरुवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय गाठले आणि प्राचार्यांची भेट घेऊन काही वीडियो दाखवले. वास्तविक राष्ट्रगीत नेहमी म्हणणे अपेक्षित असताना अनेकदा ते दैनंदिन कामकाजातून वगळले जात असल्याचे निदर्शनास आले तर काही ठराविक समाजातील विद्यार्थ्याना प्रार्थनेसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल जाब विचारला.
या मुद्द्यांवर प्राचार्यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. त्यानंतर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त करत, “आता पुढे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाईल. कोणतेही अनुचित प्रकार त्वरित थांबवले जातील,” अशी ग्वाही दिली.
या प्रसंगामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.