महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

धावत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशास आरपीएफ जवानांनी वाचवले!

  • मडगाव स्टेशनवर ‘जीवनरक्षा ऑपरेशन’ यशस्वी
  • जीवदान देणाऱ्या जवानांना सीएमडी संतोष कुमार झा यांच्याकडून  ₹10,000/- चे बक्षीस

मडगाव / गोवा: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) दोन जवानांनी प्रसंगावधान दाखवत एका ६६ वर्षीय प्रवाशाला धावत्या ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले. ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ (Operation Jeevan Raksha) अंतर्गत ही घटना मडगाव स्टेशनवर (Madgaon Station) रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईला जाताना ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

कोकणकन्या एक्सप्रेस (टगाडी क्र. २०११२) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून मडगावहून मुंबईच्या दिशेने  रवाना झाली होती. याच वेळी, गणेश लिम्राज श्रीदत्त (वय ६६, रा. आडनी, जि. उस्मानाबाद, महाराष्ट्र) नावाचा प्रवासी मागील जनरल डब्यातून चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात त्यांचा पाय घसरला आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये खाली पडले.

या गंभीर क्षणी, प्लॅटफॉर्म क्र. १ वर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान आरक्षक कपिल सैनी आणि प्रधान आरक्षक आर एस भाई यांनी विलंब न लावता तत्परता दाखवली. त्यांनी तत्काळ धाव घेत प्रवाशाला बाहेर खेचले, ज्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशाचा जीव वाचला.

आरपीएफ जवानांचा गौरव

या धाडसी कामगिरीबद्दल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दोन्ही आरपीएफ कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून, त्यांना प्रत्येकी ₹10,000/- (दहा हजार रुपये) बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

​जीव वाचलेल्या प्रवासी गणेश श्रीदत्त यांनी आरपीएफ जवानांचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्या तत्परतेमुळे आपल्याला नवे आयुष्य मिळाल्याची भावना व्यक्त केली.

प्रवाशांना आवाहन:

‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत आरपीएफ (RPF) सातत्याने प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी कार्यरत आहे. रेल्वे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढू नये किंवा उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे. तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या!

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button