नागरकोईल -पनवेल उद्या दुपारी रत्नागिरीत ; सायंकाळी ४.१० वा. चिपळूण तर खेडला सायंकाळी ५ वाजता
सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह चिपळूण, खेडला थांबे
रत्नागिरी : दक्षिणेतील नागरकोईल ते पनवेल दरम्यान विशेष गाडी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुटणार आहे. पनवेल इथून ही गाडी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी नागरकोईलसाठी सुटेल. कोकण रेल्वे मार्गावर धावताना ही गाडी सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगावला थांबे घेणार आहे. रत्नागिरीला दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.१० वाजता तर सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती चिपळूणला येणार आहे. सायंकाळी 5 वा. ही गाडी खेड स्थानकावर दाखल होणार आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 06071 नागरकोइल – पनवेल स्पेशल नागरकोइल येथून मंगळवार 03/10/2023 रोजी 11:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22:20 वाजता ती पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 06072 पनवेल – नागरकोइल स्पेशल बुधवार 04/10/2023 रोजी पनवेल येथून 23:50 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी ती 10:00 वाजता नागरकोइलला पोहोचेल.
ही विशेष गाडी एरनिएल, कुलितुराई, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, थ्रिसूर, शोरानूर, तिरूर, कोझिकोडे, वाडाचेर्यानूर, कानकुरनूर, कानूरोड, कानकुरन या ठिकाणी थांबेल. मंगळुरु जं., सुरथकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, मुर्डेश्वर, कुमटा, कारवार, मडगाव जं., थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबे घेणार आहे.
रचना : एकूण 21 कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.