नाटे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

रत्नागिरी (सुरेश सप्रे) : राजापूर तालुक्यातील नाटे बांदकरवाडी येथे कृष्णा थळेश्री यांचे मालकीचे विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती संदीप बांदकर सरपंच नाटे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दिली. ही माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करून सुखरूप बाहेर काढले.
ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आल्यावर त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
ही विहीर आयताकृती असून सदर विहिरीची लांबी रुंदी अनुक्रमे १२× ६ फूट आहे विहिरीची खोली अंदाजे २४ फूट आहे. त्यामध्ये अंदाजे ८ ते १० फुट पाणी होते. लेगच पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. विहिरीची उंची सुमारे १२-१५ फूट असलेने बिबट्याने दोन वेळा पिंजऱ्यावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतू बिबट्या बाहेर येऊ शकला नाही. नंतर अथक परिश्रमाने बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यात जेरबंद करणेत आले.
नंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर चोपडे यांचेकडून बिबट्याची तपासणी करून घेतली सदर बिबट्या सुस्थितीत असलेची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केली.
सदर बिबट्या हा मादी असून तिचे वय सुमारे दोन ते अडीच वर्ष आहे.
विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम.प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य करण्यात आले. यासाठी विभागीय वन अधिकारी श्रीम. गिरीजा देसाई वनक्षेत्रपाल रत्नागिरी. प्रकाश सुतार.वनपाल राजापूर जयराम बावदाणे. वनपाल लांजा सारीक फकीर. वनरक्षक राजापूर. विक्रम कुंभार , वनरक्षक कोर्ले श्रीम. श्रावणी पवार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये,नितेश गुरव, श्री.संतोष चव्हाण. निलेश म्हादये ,रूपेश कोठारकर सरपंच नाटे संदीप बांदेकर. पोलीस कॉन्स्टेबल कुसाळ व ठीक , तसेच प्रसाद मोदी, संदीप डुगिलकर, दीपक लाड, नितीन थळेश्री , संतोष चव्हाण, सरफराज हातवडकर व नाटे ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.





