रत्नागिरी अपडेट्स
ना. सामंत यांच्या हस्ते कोतवडे येथे विकास कामांचे भूमिपूजन
रत्नागिरी : रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कोतवडे गावातील तीन कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित,उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, तालुकाप्रमुख महेश म्हाप, सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.