महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे एस. पी.

रत्नागिरी (सुरेश सप्रे) : रत्नागिरी जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत.

रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक ‌‌धनंजय कुलकर्णी यांची बढती मिळाल्याने मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली.

त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे..

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नितीन बगाटे यांच्या नियुक्तीमुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरीतील जिल्हात वाढत असणारा अवैध अंमली पदार्थांचा व्यापार समुळ नष्ट करण्याचे मोठे आव्हान बगाटे यांच्यासमोर असणार आहे. बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button