पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा मंत्र!

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत पटवर्धन हायस्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रत्नागिरीमधील नाचणे परिसरात आगाशे मॉल समोर स्वच्छते विषयी जागृती करणारे पथनाट्य सादर केले.
नाचणे भागातील आगाशे मॉलसमोरील भागात विद्यार्थ्यांनी संगीत साथीसह कचऱ्याच्या समस्येवर नाटय स्वरूपात विविध प्रसंगांतून जागृती करण्यात आली
ओला सुका कचरा वेगळा करणे कचऱ्याचे हानिकारक कचरा वैद्यकिय कचरा ई- कचरा अशा वेगवेगळया प्रकारात वर्गीकरण करणे अशा विविध प्रकारची उपयुक्त माहिती पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी दिली
भारत शिक्षण मंडळाचे संस्था पदाधिकारी अनंत आगाशे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या साठी संगीतसाथ संकेत पाडळकर यांनी दिली
पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशालेच्या शिक्षिका श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले