परतीच्या प्रवासासाठी आरवली येथून मुंबई-पुण्यासाठी थेट बस सेवा!

आरवली : गणेशोत्सवानंतर परतीला लागलेल्या कोकण वासियांसाठी आरवली येथून थेट बस सेवा उपलब्ध करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

यावेळच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे एसटी महामंडळाच्या गाड्या तसेच खासगी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर मुंबई -पुण्यातील कोकण वाजले मंडळी दाखल झाली होती. कोकणवासियांसाठी रेल्वेने सोडलेल्या विशेष गाड्यांसह मुंबईतून मोदी एक्सप्रेस ट्रेन तसेच विविध राजकीय पक्षांकडून सोडण्यात आलेल्या बसेस कोकणात मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या.
गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मागील दोन दिवसांपासून मोठ्या संख्येने कोकणवासीय आपापल्या मूळ ठिकाणी परतू लागले आहेत. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथून आरक्षित केलेल्या एसटी बसेस तसेच खासगी आराम बसेस देखील परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गातून येणाऱ्या पुढे मुंबई पुण्याकडे जाताना पुढे जाताना आरवली परिसरातील गावांमधील प्रवाशांची गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळली आहे.