अजब-गजबब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

पर्यावरण आणि प्राणी प्रेमींसाठी सुखद बातमी… लांजात भांबेडमध्ये बागडताना आढळले दुर्मिळ शेकरू!

लांजा :  लांजा तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशु शेकरू हा अत्यंत दुर्मिळ प्राणी याचे दर्शन झाले आहे या शेकरू उडती खार या दुर्मिळ प्राण्याचा झाडांवर बागडताना चे दृश्य श्री नवल शेवाळे यांनी टिपले आहे.


वन पर्यावरण आणि प्राणी प्रेमींसाठी सुखद बातमी आहे लांजा वनपाल श्री दिलिप आरेकर यांनी चित्रित केलेल्या चित्रफितीत दिसणारा प्राणी शेकरू असल्याचे सांगितले शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे उडती खार ही खारीची प्रजात आहे.


शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; इंग्लिश: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो. भांबेड येथील नवल शेवाळे हे मुंबई त नोकरी निमित्त स्थायिक आहे मुळगाव भांबेड मुंबई येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी गावी काजू आणि आंबा याची बाग जोपासली आहे लांजा पूर्व विभाग सह्याद्रीच्या पायथ्याशी येतो पूर्व भागात खोरनिनको, प्रभान वल्ली, भांबेड या गावात जंगल वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे पूर्वी आंबा घाटात जंगल परिसरात शेकरू हा प्राणी आढळत असे भीमाशंकर पर्वत भागात शेकरूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे परंतु हळूहळू या प्राण्याचे प्रजनन कमी होत गेले आहे.

मी दोन दिवसापूर्वी मुंबई येथून भांबेडगावी आलो होतो. बागेत गेल्यानंतर मला एक वेगळा प्राणी एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत असल्याचे पाहिले. सुरुवातीला माकडा सारखा असणारा प्राणी कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले.

नवल शेवाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष.

 

नवल शेवाळे यांनी सांगितले की, मी दोन दिवसापूर्वी मुंबई येथून भांबेडगावी आलो होतो बागेत गेल्यानंतर मला एक वेगळा प्राणी एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत असल्याचे पाहिले सुरुवातीला माकडा सारखा असणारा प्राणी कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले नवल शेवाळे यांनी चित्रीत केलेला ही चित्रफित भांबेड गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हेगिष्टये यांनी वनाधिकारी यांना खात्री करण्यास सांगितले नवल शेवाळे यांनी वन अधिकाऱ्यांची संपर्क करून हा प्राणी शेकरू असल्याचे खात्री केली. लांजा तालुक्यात शेकरू आढळल्याने एक वन पर्यावरणाची सुखद आणि दिलासा देणारी घटना मानली जात आहे. वनसंपदा आपण जोपासली पाहिजे असेही भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवल शेवाळे यांनी सांगितले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button