महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
पाली एसटी बस स्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

रत्नागिरी : जिलल्हा दौऱ्यावर असताना रत्नागिरी तालुक्यातील पाली बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

बस स्थानकाच्या पाहणी दरम्यान संबंधित ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना बस स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल पंडित,युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, संदीप गराटे, बबलू कोतवडेकर तसेच स्थानिक गाळेधारक उपस्थित होते.
- हेही वाचा : Konkan Railway | ‘दिवा-सावंतवाडीला’जोडलेले एसी डबे पुढील सूचनेपर्यंत कायम
- कोकणातून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा
- कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे