ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

पावसाचा ताजा इशारा… रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्यापासून दोन दिवस ‘रेड अलर्ट’

  • 15 व 16 जून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
  • नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. 12 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 व 14 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 15 व 16 जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात असून, या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.

वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112. जिल्हा रुग्णालय 02352-222363. महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018. तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127, तहसिल कार्यालय लांजा 02351-230024, तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027, तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044, तहसिल कार्यालय खेड 02356- 263031, तहसिल कार्यालय दापोली 02358-282036, तहसिल कार्यालय गुहागर 02359- 240237, तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236.
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. पाऊस पडत असताना वीजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलवर संभाषण करु नये. इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button