पुढील काही तासात कोकण रेल्वेची वाहतूक सुरू होणार!
कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची माहिती
रत्नागिरी : खेडनजीक रविवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मार्गावरील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, खबरदारी म्हणून पुढील काही वेळ वाहतूक बंद ठेवणे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे असून पुढच्या अवघ्या काही तासात रेल्वे वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी दिली.कोकण रेल्वेच्या बंद असलेल्या वाहतुकीबाबत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ प्रसारित करून प्रवासी जनतेला ही माहिती दिली आहे.
कोकण रेल्वेचे सीएमडी यांनी माहितीनुसार सायंकाळी ४ किंवा त्याआधी कोकण रेल्वेची वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे. रेल्वेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीमुळे वेगवेगळ्या स्थानकांवर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.