पूर्ण केलेल्या शासकीय कामांची थकित बीले त्वरित अदा करावी
सुशिक्षित अभियंता संघटनेची मागणी
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्यातील कंत्राटदार यांची थकित देयके त्वरित मिळावीत तसेच अन्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या माध्यमातून सागर मांगले जिल्हाध्यक्ष, अभियंता संघटना, रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी. रत्नागिरी याना निवेदन दिले.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
महाराष्ट्र राज्यातील ओपन, छोटे-मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडील विकास कामे मक्त्यानी पूर्ण केली असून त्या कामांचे आजपर्यंतची थकित देयके लवकरात लवकर अदा करावीत.
त्याचबरोबर राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार व विकासकांनी केलेल्या विकासाच्या कामांची प्रलंबित ४० हजार कोटींची देयके तातडीने द्यावी.१०० टक्के तरतूद यापूढे सरकारी कामे निधी मंजूर असल्याशिवाय मंजूर करु नयेत.
राज्यातील सर्व विभागांकडील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, ओपन कंत्राटदार यांना शासन निर्णयानुसार ३३:३३:३४ वाटपव्हावीत. तसेच ग्रामविकास विभागाची ४०:२६:३४ या शासन निर्णयानुसारच व्हावीत.अशी मागणी करुन
राज्यातील छोटया कामांचे अजिबात एकत्रिकरण करु नये व मोठया निविदा नियमबाह्य पध्दतीने काढू नयेत, अशी मागणी केली.
राज्यातील कंत्राटदार व विकासकांना सरकारी कामे करताना संरक्षण कायदा मंजूर करावा.या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व न्याय दिला जावा अश्या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.