प्रवाहाविरुद्ध उभे राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
- स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ना. राणे यांनी अभिवादन केले.
रत्नागिरी : प्रवाहाविरुद्ध उभ राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे दिली.
हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ येथे महाआरती करून श्री हनुमानाला वंदन केले. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या महा आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रथमच अशा भव्य स्वरूपात होणाऱ्या श्री हनुमानाच्या महा आरतीमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. गाडीतळ येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ना. राणे यांनी अभिवादन केले.

या निमित्ताने खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या खासदार श्री २०२५ बॉडीबिल्डिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचेसह गजानन करमरकर, संजय जोशी, प्रवीण जोशी, चंद्रकांत रावुळ, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. भाऊ शेट्ये यांचेसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.