महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
‘प्रहार’च्या रणरागिणी काजल नाईक यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान
काजल नाईक रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या
रत्नागिरी : रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या व सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ‘प्रहार’च्या रणरागिणी सुनिता शशिकांत सुर्वे तथा सौ काजल परेश नाईक यांना कोकणरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र तसेच मुंबई, ठाणे व संपूर्ण कोकणामध्ये त्यानी आपला सामाजिक कार्यातून ठसा उमटवला आहे. दिव्यांगांना मासिक मानधन व दुकान देऊन त्यांनी दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. गोरगरिबांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांना देखील त्यांनी त्यांच्या मागण्या व त्यांना न्याय मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला आहे.
काजल नाईक रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या
सध्या त्या प्रहार दिव्यांग क्रांती ठाणे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या अशा या सामाजिक कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियानने त्यांना *कोकणरत्न* पुरस्कार जाहीर केला आहे. १३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रत्नागिरी मुंबई परिसरातून काजल ताई यांच्यावर अभिनंदनपर वर्षांवं होत आहे.





