महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर, जागाही उपलब्ध, पण वणौशी तर्फे पंचनदी ग्रा.पं.चे NOC रखडले!

दापोली  (सागर गोवळे ) : तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी आणि पंचनदी हद्दीतील ग्रामस्थांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर केले आहे. मात्र, मूळ प्रस्तावित जागेवर तांत्रिक अडचणी आल्यामुळे ग्रामपंचायत पंचनदीने आपल्याच हद्दीत श्रीमती. सुलोचना महादेव घडसे (सर्वे क्र. १०/२, महसूल गाव दुमदेव) यांच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

या जागेसंबंधी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरपंच सौ. संकल्पा संदीप शिंदे यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकृत पत्र पाठवून जागा उपलब्धतेचा निर्णय कळविला. यासोबत ७/१२, ८अ उतारे व स्थळ दर्शक नकाशा देखील पाठवण्यात आले होते.

मात्र आता अडचण ही आहे की ‘NOC’ मध्ये – वणौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र रखडले आहे.

ही जागा वणौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्यामुळे तेथून ‘ना हरकत प्रमाणपत्र (NOC)’ आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत पंचनदीने वेळोवेळी पाठपुरावा केला असून, त्यामध्ये महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे:

  • ०६ नोव्हेंबर /२०२३ –वणौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायत कडे ना हरकत दाखला मागणी पत्
  • २४ जून २०२४ –वणौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायत ला स्मरणपत्र
  • ०३/१०/२०२४ – वणौशी तर्फे पंचनदीच्या मागणी प्रमाणे 7/12 , आठ अ आणि स्थळदर्शक नकाशा सादर
  • १६ जानेवारी २०२५ – ग्रामविकास अधिकारी यांना पत्र
  • ३ फेब्रुवारी २०२५ – मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाहीसाठी पत्र

दरम्यान, आजअखेर वणौशीतर्फे पंचनदी ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. शिवाय त्यांनी आरोग्य उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध केलेली नाही. परिणामी, शासनाकडून मंजूर झालेली आणि निविदा प्रक्रियेत आलेली कामे रखडली असून, नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळण्यात विलंब होत आहे.

(छायाचित्र : प्रतिकात्मक )

ग्रामपंचायत पंचनदीची स्पष्ट भूमिका

ग्रामपंचायत पंचनदीने शासनाचे काम रखडू नये म्हणून स्वतःच्या हद्दीतून योग्य अशी जागा पुरवली असून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. आता फक्त वनौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायतीचे NOC मिळणे बाकी आहे.

प्रशासनाचा हस्तक्षेप गरजेचा

या प्रकारामुळे शासनाच्या मंजूर योजनेची अंमलबजावणी अडचणीत आली असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून वनौशी तर्फे पंचनदी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून द्यावे, अशी मागणी पंचनदी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button