ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
फुकट्या प्रवाशांकडून कोकण रेल्वेने वसूल केला १ कोटी ९५ लाखांचा दंड!
रत्नागिरी : कोकण रेल्वे सातत्याने आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या तसेच फलाटांवर तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान डिसेंबर 2023 मध्ये एकूण 6, 675 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांना दंड करण्यात आला असून एकूण ₹1,95,64,926/- दंड वसूल करण्यात आला.
डिसेंबर 2023 मधील प्रकरणांची संख्या : 6,675.
दंड वसूल : ₹१,९५,६४,९२६/-
कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेत गेल्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर 2023) एकूण 18,466 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकिटांशिवाय आढळून आले आणि त्यांना दंड करण्यात आला. एकूण ₹5,60,99,017/- दंड वसूल करण्यात आला.
कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करते, कारण KRCL त्याच्या संपूर्ण मार्गावर या तीव्र तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले आहे