मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे ‘स्थानिक माशांच्या प्रजाती आणि पर्यावरणाचे संवर्धन’ विषयावर प्रमोद माळी यांचे व्याख्यान

रत्नागिरी: “मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन” शिरगाव रत्नागिरी येथील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी “स्थानिक माशांच्या प्रजाती आणि पर्यावरणाचे संवर्धन” या विषयावर वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्था,आंबा, कोल्हापूर चे प्रमुख श्री.प्रमोद माळी यांनी व्याख्यान दिले.

श्री. प्रमोद माळी यांनी विविध स्थानिक माशांच्या प्रजाती, त्यांचे प्रजनन कसे करावे, तसेच पर्यावरणाचे संवर्धन याविषयी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद माळी यांचे स्वागत व ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
या कार्यक्रमासाठी वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन चे कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रम आयोजन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक श्री.निलेश मिरजकर,श्री. रोहित बुरटे, श्री सुशील कांबळे तसेच कार्यालय अधीक्षक श्री. विलास यादव यांनी कष्ट घेतले.