महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांची जयंती उत्साहात

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीचक्रधरस्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीचक्रधरस्वामी हे कृष्ण धर्माच्या महानुभाव पंथाचे संस्थापक, एक थोर समाजसुधारक आणि ‘लीळाचरित्र’ या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक होते. त्यांनी तत्वज्ञान मराठी भाषेतून शिकवले, ज्यामुळे मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान मिळाले.या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी श्रीचक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.