महामार्गावरील खोकेधारकांना उद्या दुपारी पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वाटप
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात नुकसान झालेल्या छोट्या खोकेधारकांना त्यांच्या रखडलेल्या भरपाईचे वाटप शुक्रवारी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महामार्गावरील खोकेधारकांच्या नुकसान भरपाईचे वाटप व अन्य कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत हे 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यामधील खोकेधारकांना नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वाजता मनशक्ती केंद्र लोणावळा तर्फे आयोजित ‘शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा’ तसेच आशियातील पहिले ‘माईंड जीम’ कार्यक्रम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सभागृह) दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रम (स्थळ : देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल) दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल) दुपारी 1.30 वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील खोकेधारकांच्या नुकसान भरपाईचे धनादेश वाटप कार्यक्रम (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी 3.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मुंबई कडे प्रयाण.