महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सहेल्थ कॉर्नर
महिला बचत गटांसाठी आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी दि.११ (जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास कार्यक्रम आणि जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग, प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने माविम स्थापित लोक संचालित साधन केंद्रामधील महिला बचत गटांसाठी उद्या शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप येथे रानभाजी महोत्सव आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रचार प्रसिद्धी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यशाळेत कृषी पायाभूत सुविधा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.